Dighi Crime News : कंपनीमधील माल घेऊन जाणाऱ्या ट्रकची तोडफोड करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – कंपनीमधून माल खरेदी करून ट्रकमधून घेऊन जात असताना दोघांनी मिळून ट्रक अडवले. तसेच ट्रकची तोडफोड करण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री आठ वाजता दिघी येथील प्रोथॉम इंडस्ट्रीज इंडिया प्रा. ली. या कंपनीत घडली.

कृष्णा अशोक तापकीर (वय 35), नितीन सुदाम तापकीर (वय 32, दोघे रा. वडमुखवाडी, च-होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत देवांग प्रमेश संपत (वय 44, रा. वाशी, नवी मुंबई) यांनी सोमवारी (दि. 1) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संपत यांनी दिघीमधील प्रोथॉम इंडस्ट्रीज इंडिया प्रा. ली. या कंपनीतून माल खरेदी केला होता. खरेदी केलेला माल ट्रकमधून घेऊन जात असताना आरोपींनी ट्रक अडवले. ट्रकची तोडफोड करण्याची धमकी देत फिर्यादी यांच्या कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1