Dighi Crime : फायनान्स कंपनीने सील केलेल्या फ्लॅटवर ताबा, दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज –  गृहकर्ज न फेडल्याने फायनान्स कंपनीने सील (Dighi Crime) केलेल्या फ्लॅटवर दोघांनी अनधिकृतपणे ताबा मारला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 एप्रिल रोजी दिघी येथे घडला.

संतोष जालिंदर शिर्के (रा. दिघी) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चोलामंडलम फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतले. त्याचे हप्ते थकवून गृहकर्ज फेडले नाही. फायनान्स कंपनीने वेळोवेळी तोंडी सूचना आणि कायदेशीर नोटीस दिल्या.

PCMC : 120 वाहनांच्या लिलावातून पालिकेला मिळणार 1 कोटी

तरीही आरोपींनी गृहकर्ज भरले नसल्याने फायनान्स कंपनीने फ्लॅट (Dighi Crime) सील केला. त्यानंतर आरोपींनी फ्लॅटवर ताबा मारून त्याचा वैयक्तिक कारणासाठी वापर केला असल्याचे फिर्यादीत म्हटले म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.