Dighi Crime : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाचे अमिश दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकांनी पीडित तरुणीला जातवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आळंदी परिसरात घडली.

रामेश्वर शिवाजी विघ्ने (वय 28, रा. ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बाळू शिवाजी विघ्ने (रा. लहूळ ता. माजलगाव, जिल्हा बीड), गणेश कोल्हे, रामेश्वर याची आई (नाव माहिती नाही), रामेश्वर विघ्ने याची बहीण (नाव माहिती नाही), संकेत कुलकर्णी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना फेब्रुवारी 2018 ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये आळंदी परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामेश्वर विघ्ने आणि पीडित तरुणी यांची ओळख उर्से येथील एका कंपनीत काम करीत असताना झाली. आपण आळंदी येथे देवदर्शनाला जाऊ, असे सांगून आरोपीने तरुणीला आळंदी येथील लॉजवर नेले. मला तू खूप आवडते, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, असे सांगून फिर्यादी तरुणीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. पीडित तरुणीने आरोपीला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने जातीवाचक शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. ‘तुला काय करायचे ते करून घे, मी तुझ्याशी लग्न करणार नाही’, असे त्याने सांगितले. तसेच इतर आरोपींनी देखील पीडित तरूणीला जातीवाचक शिवीगाळ केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.