Dighi : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या युवकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या युवकाला ट्रकने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी पावणेसहाच्या सुमारास पुणे-आळंदी रोडवर दिघी येथे घडली.

सुरेश गवळी असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी महेश गवळी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश गवळी गुरुवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी पुणे-आळंदी रोड वरून जात होते. ते तलेरा गोडाऊन गेटच्या जवळ आले असता एका भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली.

यामध्ये सुरेश गवळी गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता ट्रकचालक निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल केला असून दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.