Dighi : इमारतीवरून पडून वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इमारतीवरील (Dighi) पाण्याची टाकी भरली आहे का हे पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास विजय नगर, दिघी येथे घडली.

रामचंद्र रेवबा चंदनशिवे (वय 70, रा. विजयनगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

Pune : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीत भाग घेणाऱ्या वाहनांच्या यांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र सुविधा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र (Dighi) हे रविवारी सकाळी त्यांच्या इमारतीवरील पाण्याची टाकी भरली का हे पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीवर गेले होते. तेथून त्यांचा तोल गेला आणि ते इमारतीवरून खाली पडले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.