Dighi : दिघी परिसरात आढळला कुजलेला मृतदेह

एमपीसी न्यूज – दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Dighi ) कुजलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना मंगळवारी (दि. 12) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पठारे मळा येथे मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मयत तरुणाचे वय अंदाजे 30 वर्षे आहे त्याचा मृत्यू आठ दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. दिघी पोलीस सर्व शक्यता पडताळून तपास करीत ( Dighi ) आहेत.