Dighi : दरवाजा उघडा ठेऊन झोपला; चोरट्याने पळवला लॅपटॉप आणि मोबाईल

एमपीसी न्यूज – दरवाजा उघडा ठेऊन तरुण झोपी गेला. अज्ञात चोरट्याने उघड्या घरातून प्रवेश करत लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी साडेअकराच्या सुमारास आळंदी देवाची येथे घडली.

याप्रकरणी बद्रीनाथ नारायण नरोडे (वय 30, रा. निजानंद बाबा आश्रम इंद्रायणीनगर, आळंदी देवाची) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बद्रीनाथ हे घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून प्रवेश केला.

घरात ठेवलेले एक लॉपटॉप आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 25 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.