Dighi: उद्यापासून तीन दिवस दिघीगाव कडकडीत बंद

Dighigaon will be closed for three days from tomorrow तीन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. 7, 8 आणि 9 जुलै असे तीन दिवस संपूर्णपणे बंद पाळण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

एमपीसी न्यूज- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिघीगाव उद्यापासून तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला, दूधपुरवठा देखील बंद ठेवण्यात येणार आहे. 7, 8 आणि 9 जुलै असे तीन दिवस संपूर्ण बंद असणार आहे. ग्रामस्थांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत पोलिसांनाही निवेदन देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने अक्षरशः विळखा घातला आहे. शहराच्या संपूर्ण भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. शहरातील रुग संख्या झपाट्याने वाढत आहेत.

मागील काही दिवसांपासून एका दिवसाला 200 ते 340 रुग्ण सापडत आहेत. शहरातील रुग्णसंख्या साडेचार हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. दिघी परिसरात तर सुरुवातीपासून रुग्ण सापडत आहेत. दिघी-बोपखेलची रुग्ण संख्या 100 च्या घरात गेली आहे.

वाढती रुग्णसंख्या पाहता ग्रामस्थांनी एक बैठक घेतली. तीन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. 7, 8 आणि 9 जुलै असे तीन दिवस संपूर्णपणे बंद पाळण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला, दूधपुरवठा देखील बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक विकास डोळस यांनी केले आहे.

खासगी कंपनीतील, सरकारी कर्मचाऱ्यांनीही तीन दिवस सुट्टी घ्यावी. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यात मदत होईल असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.