Dighi : अम्पायरने नो बॉल दिल्याने दोन गटात मारामारी, परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – क्रिकेट खेळताना अम्पायर ने नो बॉल ( Dighi ) दिला. याबाबत खेळाडूंनी अम्पायरला जाब विचारला असता अम्पायरने खेळाडूंना मारहाण केली. त्यानंतर खेळाडूंनी अम्पायर ची बाजू घेणाऱ्या गटातील तरुणांना मारहाण केली. हा प्रकार शनिवार (दि. 27) आणि रविवारी (दि. 28) दिघी येथे घडला.

यासीन आशिष चिट्टपरम (वय 24, रा. दिघी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बापू परांडे (वय 32, रा. परांडे होम्स, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इतर मुले शनिवारी रात्री दिघी येथील मैदानात क्रिकेट खेळत असताना बापू परांडे हा अंपायरिंग करत होता.

परांडे याने एक नो बॉल दिला. त्याबाबत फिर्यादी आणि इतर खेळाडूंनी जाब विचारला. त्यावरून परांडे याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी, हाताने मारून शिवीगाळ केली. तू दिघीमध्ये राहायचे नाही, अशी फिर्यादीस धमकी दिली. काही वेळाने पुन्हा फिर्यादीस दगडाने मारले.

Pimpri : महापालिकेच्या बस अभावी शेकडो विद्यार्थी होतील ‘शाळाबाह्य’

कारमधील हॉकीस्टिकने फिर्यादीच्या पाठीवर, खांद्यावर, कमरेवर, हातावर मारून जखमी केले. ‘तू यापुढे दिघी मध्ये दिसला तर तू मरणार, अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात गुलाब बबन परांडे (वय 35, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पप्या चिट्टपरम (वय 22), रोहित उदयराज सिंग (वय 21), यासीन चिट्टपरम (वय 22, सर्व रा. दिघी) आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी आणि इतर मुले क्रिकेट खेळत असताना शनिवारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी कोयते घेऊन मैदानात आले. बापूला बोलवा. त्याचा मर्डर करणार आहोत. त्याला मारून टाकणार आहोत, अशी आरोपींनी धमकी दिली.

त्यातील एकाने दोघांची गचांडी पकडून, ‘तुम्ही बापूला काल मदत केली’ असे म्हणून स्टंपने मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी मध्ये गेले असता त्यांच्या डोक्यात स्टंप लागल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतर आरोपी कोयते हवेत फिरवत दहशत पसरवून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले ( Dighi )आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.