Dighi : खासगी कारणासाठी व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Filed a case of kidnapping a person for private reasons

एमपीसी न्यूज – खासगी कारणासाठी दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यक्तीचे स्कोर्पिओ कारमधून आलेल्या इसमांनी अपहरण केले. ही घटना बुधवारी (दि. 24) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास भारतमाता नगर, बुद्ध विहार, दिघी येथे घडली. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्यनारायण दत्तात्रय गवळी (वय 26, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सिद्धेश्वर शिंदे (वय 38, रा. गणेशनगर, पुणे) आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 36 वर्षीय मित्र भोसरीकडून दिघीकडे दुचाकीवरून जात होता. तो भारतमाता नगर, बुद्धविहार दिघी येथे आले असता आरोपी सिद्धेश्वर आणि त्याच्या साथीदार स्कोर्पिओ कारमधून आले. त्यांनी फिर्यादी यांच्या मित्राचे अपहरण केले.

याबाबत फिर्यादी यांना अपहरण झालेल्या कर्नाटक येथील भावाने माहिती दिली.

त्यानुसार, फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केली असता तिथे त्यांच्या मित्राची दुचाकी पडलेली आढळून आली. सिद्धेश्वर याने त्याच्या खासगी कारणासाठी फिर्यादी यांच्या मित्राचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.