Dighi: तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

Dighi: Four persons charged with beating a youth

एमपीसी न्यूज- तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि.5) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आदर्शनगर दिघी येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव बनकर (वय 24, रा. शिवनगरी, आदर्शनगर, दिघी) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी किरण संपत गावडे (वय 24, रा. पोलीस कॉलनी, शिवनगरी, आदर्शनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहा वाजता अष्टविनायक कॉलनी क्रमांक एकच्या समोर आरोपींनी फिर्यादी किरण यांना अडवले.

दोन आरोपींनी किरण यांना पकडून ठेवले. तिसऱ्या आरोपीने किरण यांच्या तोंडावर हाताने मारले.

त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने किरण यांच्या मांडीवर वार केले. यात किरण गंभीर जखमी झाले.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दिघी पोलीस तपस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.