Dighi : कोऱ्या चेकवर सह्या घेऊन मित्राची चार लाखांची फसवणूक

मित्राला दारू पाजून त्याच्या कोऱ्या चेक आणि आरटीजीएस फॉर्मवर सह्या घेतल्या. : Fraud of Rs 4 lakh from a friend by signing a blank check

एमपीसी न्यूज – मित्राला दारू पाजून त्याच्या कोऱ्या चेक आणि आरटीजीएस फॉर्मवर सह्या घेतल्या. त्याआधारे मित्राच्या खात्यातून चार लाख रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 18) दिघी येथे घडली.

सचिन अरुण पोकळे (वय 37, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश वैजनाथ राठोड, बबन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), अमोल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश आणि फिर्यादी हे एकमेकांचे मित्र आहेत. मंगळवारी आरोपी गणेश याने फिर्यादी सचिन यांना फोन करून ‘टाटा मोटर्सचे काम आले आहे’ असे आमिष दाखवून पुणे-आळंदी रोडवरील दिघी येथील इमारतीमध्ये बोलावून घेतले.

_MPC_DIR_MPU_II

आरोपीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून नेऊन सचिन यांना बळजबरीने डांबून ठेऊन दारू पाजली.

सचिन यांच्या कोऱ्या चेकवर आणि आरटीजीएस फॉर्मवर जबरदस्तीने सह्या घेतल्या. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेतून गणेश याने स्वतःच्या नावावर चार लाख रुपये सचिन यांच्या खात्यातून ट्रान्सफर करून घेतले.

या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपीने सचिन यांना दिली.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1