Dighi : राहत्या घरात गळफास घेत ग्राफिक डिझायनरची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास घेत ग्राफिक डिझायनरने आत्महत्या (Dighi)केली. ही घटना शनिवारी (दि. 30) उघडकीस आली.

नितीन ढवळे (वय 37, रा. स्प्रिंग व्हॅली, वडमुखवाडी, चऱ्होली) असे आत्महत्या केलेल्या ग्राफिक डिझायनरचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Dighi)नितीन आणि त्यांच्या पत्नी दोघेही ग्राफिक डिझायनर आहेत. शुक्रवारी (दि. 29) नितीन यांच्या पत्नी त्यांच्या सात वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी गेल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी रात्री नितीन यांनी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Chinchwad : पोलिसांच्या चोख बंदोबस्तात होणार नववर्षाचे स्वागत

शुक्रवारी रात्रीपासून नितीन फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या नितीन यांच्या मित्राला फोन करून सांगितले. मित्राने घराचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर नितीन हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.