BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : च-होली परिसरात आढळले तरस; मात्र, बिबट्याची अफवा

एमपीसी न्यूज – च-होली परिसरात बिबट्या आढळल्याची अफवा उडाली. मात्र, आढळलेला बिबट्या नसून तरस असल्याची शहानिशा सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांनी केली.

मागील दोन दिवसांपासून च-होली भागात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरु झाली. तसेच बिबट्याच्या पायाचे ठसे देखील नागरिक एकमेकांना दाखवू लागले. याची खात्री करण्यासाठी सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचे सदस्य श्रीहरी तापकीर, प्रशांत नाईकरे, निकेश रासकर आणि प्राणिमित्रांनी बिबट्या आढळलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत श्रीहरी तापकीर म्हणाले, “च-होली, दिघी, लोहगावच्या मधला भाग संरक्षण विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे या भागात तरस आणि अन्य जंगली प्राणी वास्तव्य करत आहेत. आढळलेल्या पाऊलखुणा बिबट्याच्या पाऊलखुणांपेक्षा लहान आहेत. बिबट्याच्या पाऊलखुणा मोठ्या असतात. तर तरस प्राण्याच्या पाऊलखुणा लहान असतात. आढळलेल्या पाऊलखुणा लहान आहेत. या भागात बिबट्या येणं शक्य नाही. आसपास मानवी वस्ती असल्याने बिबट्या या भागात येणं शक्य नाही.”

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like