BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : एजंटला भरदिवसा वार करून लुटले; सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कलेक्शनचे पैसे घेऊन जाणाऱ्या एका एजंटला भरदिवसा वार करून लुटल्याची घटना बुधवारी (दि.१७) दुपारी एकच्या सुमारास दिघी बन्सल सिटी परिसरात घडली.

याप्रकरणी शंभूलिंग चंद्रकांत कलशेट्टी (वय २९, रा. केशवनगर, कासारवाडी) याने फिर्याद दिली असून चार चोरट्यांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी शंभूलिंग हा ‘पे वन’ कंपनीच्या कासारवाडी कार्यालयात एजंट असून कलेक्शनचे काम करतो. बुधवारी दुपारी कलेक्शनची सुमारे 88 हजार 500 रुपयांची रोकड घेऊन दिघी बन्सल सिटी परिसरातून दुचाकीवर येत होता. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार आरोपींनी त्याला अडवले.

डोक्यात कोयत्याने वार करून रक्क्म असणारी बॅग हिसकावून पोबारा केला. यामध्ये शंभूलिंग जखमी झाला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत पोलिसांत फिरर्याद दाखल केली असून गुन्हे शाखा तसेच पोलिसांची पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.