Dighi News : सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाला 7 दिवसांचा ‘अल्टिमेटम’! 

एमपीसी न्यूज – दिघी आणि परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत महापालिका प्रशासन हलगर्णीपणा करीत आहे. (Dighi News) याबाबत स्थनिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी तक्रारी केल्यानंतर आता भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनला 7 दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे.

दिघीमध्ये अनेक दिवस पाणीपुरवठा विस्कळीत आहे. त्यासंदर्भात भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी वारंवार अधिकारी यांची भेट घेऊनही समस्या सुटली नाही .महापालिका आयुक्त व प्रशासक यांना यापूर्वी तीनवेळा निवेदन दिले तरी तोडगा निघाला नाही. अखेर विकास डोळस यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे समस्या मांडली. त्या संदर्भात महापालिका प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने  बैठक लावण्यात आली. आमदार लांडगे यांनी पाणीपुरवठा विभागास सात दिवसांचा ‘अल्टीमेटम‘ दिला व चांगलेच धारेवर धरले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विद्युत विभागाचे सह शहर अभियंता गलबले, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Alandi news : आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे कार्तिकी यात्रेनिमित्त नियोजन उत्तम – आमदार दिलीप मोहिते पाटील

आमदार लांडगे म्हणाले की, दिघी आणि परिसरातील नागरिकांच्या पाणी समस्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. पाण्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने राजकारण करु नये.(Dighi News) कोणत्याही परिस्थिती पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. आठवडाभरात अपेक्षीत कार्यवाही करुन प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

प्रशासक राजवटीमध्ये दिघी आणि आजुबाजुच्या भागातील पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. (Dighi News) प्रशासक आणि आयुक्तांना पाण्याचा रिकामा हंडा भेट दिला. ऐन दिवाळीपासून नागरिक, गृहणींना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही आमदार लांडगे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. प्रशासनाला खडसावले असून, लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे, असे माजी नगरसेवक विकास डोळस म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.