Dighi : अल्पवयीन मुलीसह एक वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण

Kidnapping of a one-year-old boy with a minor girl : अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दिघी परिसरातून 16 वर्षीय मुलीला तसेच एक वर्षाच्या चिमुकल्यास अज्ञाताने फूस लावून पऴवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दत्तनगर, दिघी येथे रविवारी (दि.12) सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिघी पोलीस ठण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 16 वर्षीय मुलगी व एक वर्षीय नातवाला दत्तनगर, दिघी येथून कोणीतरी फूस लावून पळवून नेले.

दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.