Dighi : बनावट विक्री कराराद्वारे शेतक-याची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जमीन हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे अकरा जणांनी मिळून बनावट विक्री करार करून मूळ शेतक-याची फसवणूक केली असल्याचा गुन्हे दिघी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आझादनगर, च-होली येथे घडली.

प्रमोद प्रकाश तापकीर (वय 41, रा. आझादनगर, च-होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रामसिंग सरदारसिंग बगलाल (वय 63), सुशीला रामसिंग बगलाल (वय 56), रणजितकौर रामसिंग बगलाल (वय 32), पप्या रामसिंग बगलाल (वय 30), सुमन चंदरसिंग बगलाल (वय 61, सर्व रा. च-होली), राहुलसिंग चंदरसिंग बगलाल (वय 35), अमरसिंग चंदरसिंग बगलाल (वय 30), सुनीता चंदरसिंग बगलाल (वय 34), शीतल चंदरसिंग बगलाल (वय 32), गीता चंदरसिंग बगलाल (वय 30), आदेश भाऊसाहेब हांडे (वय 35, सर्व रा. आवताडवाडी, हांडेवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद आणि त्यांचे नातेवाईक छबू लक्ष्मण तापकीर यांच्यामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद आहे. आरोपी हे छबू यांचे नातेवाईक नसताना देखील त्यांनी मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे बनवली. बनावट असलेली कागदपत्रे खरी असल्याचे भासवून सार्वजनिक नोंदी बदलून शासकीय अधिका-यांना चुकीची माहिती दिली.

आरोपींनी वेगवेगळ्या महसूल अधिकारी आणि दिवाणी न्यायालयात खोटी प्रमाणपत्रे आणि खोट्या साक्ष देऊन प्रमोद तापकीय यांच्या मालमत्तेचे बनावट विक्री करार करून फसवणूक केल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.