Dighi : चिलीम, बिडी, तंबाखू मागत एकाला मारहाण करीत लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला अडवून त्याच्याकडे चिलीम, बिडी, तंबाखू मागत मारहाण करून लुटले. ही घटना रविवारी (दि. 19) मध्यरात्री एकच्या सुमारास देहूफाटा येथील एसटी स्टँडसमोर घडली.

महेश सुधाकर माळी (वय 42, रा. इंद्रायणी घाट, आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माळी आणि त्यांचे मित्र निगडीहून आळंदीच्या दिशेने सोमवारी (दि. 20) पहाटे एकच्या सुमारास जात होते. दरम्यान, देहूफाटा येथे आरोपींनी त्यांना अडवले. तुमच्याकडे चिलीम, तंबाखू आहे का, असे विचारून आरोपींनी त्यांचे खिसे तपासण्यास सुरुवात केली. यावेळी माळी यांचा मित्र तेथून पळून गेला. माळी यांनी आरोपींना प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांच्या खिशातील सातशे रुपये काढून घेत लाकडी दांडक्याने मारहाण केली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.