Dighi : चिकन विक्रेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0 177

एमपीसी न्यूज – चिकन आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा दुकानदाराने विनयभंग केला. ही घटना दिघी येथे गुरुवारी (दि. 10) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

HB_POST_INPOST_R_A

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रिझावल हक (वय 32 रा. साई पार्क रोड, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची 11 वर्षीय मुलगी चिकन आणण्यासाठी आरोपी रिझावल हक याच्या रजिया चिकन सेंटरमध्ये गेली. त्यावेळी तिथे असलेल्या आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: