Dighi : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज- तरुणीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिघी येथे घडली.

मोहसीन रियाज घोडगे (वय 22, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 15) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडित तरुणी पूर्वी जवळ राहण्यास असल्याने त्यांची ओळख आहे. 12 ऑक्‍टोबर 2019 रोजी आरोपी मोहसीन याने तरुणीचा विनयभंग केला. मात्र पुन्हा असे वागणार नाही, अशी हमी दिल्याने तरुणीने फिर्याद दिली नाही. मात्र सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपीने पुन्हा फिर्याद तरुणीशी भांडण केल्याने तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.