Dighi : मटणाचे पैसे मागितल्यावरून दुकानदाराला मारहाण

0

एमपीसी न्यूज – एक किलो मटण घेतल्यानंतर ग्राहकाने अर्धे पैसे दिले. उरलेले पैसे मागितल्यावरून मटण विक्रेत्याला दोघांनी बेदम मारहाण केली. दुकानदाराच्या मानेवर सुरा ठेऊन शिवीगाळ केली. हा प्रकार बुधवारी (दि. 12) रात्री साडेनऊ वाजता दिघी येथील जय मल्हार मटण अँड चिकन शॉपमध्ये घडली.

प्रशांत तळमळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), नानासाहेब बुबले (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमोल शिवाजी जांभळे (वय 35, रा. च-होली, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जांभळे यांचे दिघी येथील आळंदी सर्व्हिस रोडवर जय मल्हार मटण अँड चिकन शॉप हे दुकान आहे. बुधवारी रात्री दोन्ही आरोपी जांभळे यांच्या दुकानावर आले. त्यांनी एक किलो मटण खरेदी केले. त्याचे 500 रुपये आरोपींनी जांभळे यांना दिले. मात्र, एक किलो मटणासाठी 600 रुपये लागत असल्याचे सांगत उरलेले 100 रुपये जांभळे यांनी आरोपींकडे मागितले. त्यावरून आरोपींनी जांभळे यांच्या मानेला सुरा लावून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये जांभळे यांच्या मानेवर इजा झाली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like