Dighi News: प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – नवविकास तरुण मित्र मंडळ व रुबी हॉल क्लिनीक पुणे यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त (26 जानेवारी) रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिघीतील सर्व्हे नंबर 2 होराईझन स्कुल येथे बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू दिली जाणार आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेत रक्ताचा पुन्हा तुटवडा जाणवू लागला आहे. रक्तसाठा कमी आहे. त्यामुळे रक्ताची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन, इ प्रभाग समितीचे सभापती विकास डोळस, भाजपचे सचिव कुलदिप परांडे यांनी केले.

रक्तदान शिबिराच्या आयोजनात विघ्नराजेंद्र सार्वजनिक गणेश मंदिर, संकल्पना प्रतिष्ठाण, कपिल वस्तू बुद्ध विहार, संघर्ष स्पोर्टस् क्लब, शिवमुद्रा मित्र मंडळ, सर्व-धर्म समभाव प्रतिष्ठाण, आरडी बॉईज् यांनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.