Dighi news: मुक्त पत्रकार गणेश थोपटे यांचे कोरोनामुळे निधन

0

एमपीसी न्यूज – दिघी येथील मुक्त पत्रकार गणेश पोपट थोपटे यांचे कोरोनामुळे आज (सोमवारी) निधन झाले. भोसरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. गणेश थोपटे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात मुक्त पत्रकारिता करत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक व राजकीय विषयांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केले. सामाजिक कार्यासह कुणाच्याही मदतीसाठी ते कायम अग्रेसर असत.

थोपटे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर भोसरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या तळमळीच्या युवा पत्रकाराच्या निधनाने पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment