Dighi News: ‘ई’ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, कुलदीप परांडे यांच्या दिनदर्शिकेचे महेश लांडगे यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ई’ प्रभागाचे अध्यक्ष विकास डोळस आणि सामाजिक कार्यकर्ते कुलदीप परांडे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) दिघीत झाले.

_MPC_DIR_MPU_II

‘ई’ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, कुलदीप परांडे यांनी 2021 या नव वर्षाची दिनदर्शिका तयार केली आहे. दिनदर्शिकेचे हे चौथे वर्ष आहे. दिनदर्शिकेवर दिघी-बोपखेल प्रभागात मागील चार वर्षात केलेल्या विकास कामांची छायाचित्रांसह माहिती देण्यात आली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या दिनदर्शिकेचे प्रभागातील नागरिकांनी स्वागत केले. विकास डोळस यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.