Dighi News : दत्तगडावरील ‘त्या’ एक हजार झाडांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

एमपीसी न्यूज – दिघी येथील दत्तगडावर अविरत श्रमदान संस्थेच्या वतीने एक हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्या झाडांना पाणीपुरवठा वेळेवर आणि मुबलक प्रमाणात व्हावा, यासाठी रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्कच्या वतीने पाण्याची टाकी देण्यात आली.  या टाकीचा लोकार्पण सोहळा आज (बुधवारी, दि. 23) गडावरील दत्त मंदिराशेजारी झाला.

यावेळी रोटरी क्लब कोरेगाव पार्कचे अध्यक्ष हॅरी जाॅर्ज, पदाधिकारी ॲड. सुनिल विनायक कदम, रत्नाकर शेट्टी, संदेश गुप्ता, सुदेश हाडके, अशोक संदलकर, निरज मेहता, सतीश देशचौगुले, सुधा, राकेश नथवानी तसेच दिघी गावचे संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

अविरत श्रमदानच्या निसर्गप्रेमी स्वयंसेवकांनी दिघी येथील दत्त गडावर हजारो झाडे लावली आहेत. स्वयंसेवकांचे वृक्षारोपणाचे काम अविरतपणे अजूनही सुरु आहे.

वृक्षारोपण करायचे, पूर्वी केलेल्या वृक्षांचे संगोपन करायचे, झाडांची निगा राखायची, त्यांना खत-पाणी असं सगळं हे स्वयंसेवक अविरतपणे करत आहेत. त्यांच्या कामाला रोटरी सारख्या सामाजिक संस्थांचा देखील हातभार लागतो.

त्यातूनच रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्कच्या वतीने डोंगरावरील झाडांना पाणीपुरवठा मुबलक होण्यासाठी पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी दिली. पाणी साठवण करण्यासाठी व्यवस्था झाल्याने गडावरील एक हजार झाडांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

कार्यक्रमचे सुत्रसंचालन ॲड. सुनिल लक्ष्मण कदम यांनी केले. डॉ. निलेश लोंढे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविरत श्रमदान या संस्थेचे वृक्षमित्र जितेंद्र माळी, शिवाजी जगताप, भुजंग दुधाळे, प्रभाकर नागरगोजे, संतोष शिर्के, संतोष काळे, डॉ. दीपिका कदम, रामदास नरवडे, सिधू अवचर, कैलास माळी, नितीन शिंदे, अभिजीत दारवटकर, प्रवीण वाळके, मनीष सासवडे, नितीन नराळे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.