Dighi news: दिघीतील ‘त्या’ कावळ्यांचा मृत्यू व्हायरल इन्फेक्शनमुळे; तपासणी अहवालात झाले स्पष्ट

एमपीसी न्यूज –  दिघीत झालेल्या कावळ्यांचा मृत्यू हा पक्षांच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. याबाबतचा तपासणी अहवाल महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे प्राप्त झाला आहे.

दिघीत बी.यू. भंडारी गृहनिर्माण सोसायटी  परिसरात एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सात ते आठ दिवस दररोज दहा ते 12 कावळे मरून पडत होते.  हवेतून कावळे खाली पडत होते. दोन पायावरून अचानक कावळे एका पायावर उभे राहत आणि मृत्युमुखी पडत होते.

_MPC_DIR_MPU_II

दररोज एकाच ठिकाणी कावळे मरून पडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  कावळ्यांना फूड पॉयजनिंग झाल्याचा किंवा संसर्गजन्य रोग, पक्षांमधील  व्हायरल इन्फेकशन असण्याची शक्यता पशुतज्ज्ञांनी व्यक्त केली होती.

महापालिकेने मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी औंधला पाठविले होते. सातत्याने पक्षांच्या संशयास्पद मृत्यूमुळे आपल्या शहरांमध्ये सुद्धा बर्ड फ्लू  आजाराचा प्रादुर्भाव झाला की काय, अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगत होत्या.

मात्र, आता मृत पक्षांचा तपासणी अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यक विभागाकडे आला असून त्यामध्ये पक्षांमध्ये आढळणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनमुळे  पक्षांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कावळ्यांचा मृत्यू हा व्हायरल इन्फेक्शनने झाला असल्याचे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.