Dighi : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरी गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना दिघी येथे बुधवारी (दि.16) सायंकाळी घडली.

विकी मदन सिंग (वय 19, रा. स्वराज कॉलनी, गजानन महाराज नगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी याने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्याच्या पालकांनी त्यास जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले. विकी हा आळंदी येथील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.