Dighi : व्याजाच्या पैशातून झालेल्या वादातून कर्जदाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – व्याजाच्या पैशातून झालेल्या वादातून कर्जदाराला चौघांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आळंदी येथे घडली असून याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मारुती धुराजी ढगे (वय 49, रा. चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अवधूत जालिंदर गाढवे (वय-27 रा. मोशी) व बाबू (पूर्णनाव माहिती नाही) व याचे दोन साथीदार अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील अवधूतला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती यांनी मुलीच्या बाळंतपणासाठी अवधूतकडून 50 हजार रुपये हे 20 टक्के व्याजाने घेतले होते. हा व्याजदर जास्त असल्यामुळे मारुती यांनी नातेवाईकांकडून पैसे गोळा केले व मुद्दल व एक महिना व्याजाचे 10 हजार असे एकूण 60 हजार रुपये अवधुत याला परत केले. ही रक्कम घेऊनही अवधुत याने मारुती यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना जबरदस्ती दुचाकीवर बसवून आळंदी येथे नेऊन त्यांच्या खिशातील 25 हजार रुपये काढून घेतले व त्यांना मोहिनी लॉज येथे डांबून ठेवले. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.