Dighi : दिघीमधून पिकअप, वाकडमधून कार चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज – दिघी परिसरातून पिकअप आणि वाकड परिसरातून टाटा सुमो कार चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 12) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिघी येथील मॅगझीन चौकात पहिली घटना घडली. मंगेश गोविंद दौंडकर (वय 31, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ब्रिजकुमार गोविंद दास (वय २७, रा. बागडेचाळ, भारतमाता नगर, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दौंडकर यांनी त्यांची साडेतीन लाख रुपये किमतीचा पिकअप (एम एच 14 / जी डी 5153) बुधवारी (दि. 11) दुपारी साडेपाच वाजता मॅगझीन चौक, दिघी येथील गोफर्स कंपनी येथे पार्क केला. आरोपी ब्रिजकुमार याने पिकअप चोरून नेला. ही घटना गुरुवारी पहाटे साडेचार वाजता उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

वाकड येथील फाईव्ह गार्डन सोसायटी येथे दुसरी घटना उघडकीस आली. आनंद तात्या साठे (वय 32, रा. इंदिरा वसाहत, औंध) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 55 हजार रुपये किमतीची टाटा सुमो (एम एच 14 / पी 5606) कार बुधवारी (दि. 11) रात्री आठ वाजता फाईव्ह गार्डन सोसायटी, वाकड येथे पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्याने कार चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 12) सकाळी सात वाजता उघडकीस आली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.