Dighi : पिंपरी-चिंचवड शहरातून पावणे तीन लाखांच्या दुचाकी पळविल्या; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी दिघी, चाकण, एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात आशिष विष्णू नलावडे (वय 28, रा. दिघी) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नलावडे यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची एम एच 12 / आर बी 6424 दुचाकी घराच्या व्हरांड्यात पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 28) सकाळी उघडकीस आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात समरथमल बगडीराम गादडी (वय 30, रा. चाकण) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची एम एच 14 / इ पी 3050 ही दुचाकी 23 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या प्रकरणात गोकुळ बाळू मिसाळ (वय 32, रा. मोशी प्राधिकरण) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिसाळ यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी के 5881 ही दुचाकी 25 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता इंद्रायणी नगर येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केली. भरदिवसा चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

चौथ्या प्रकरणात सौरभ सिंग ब्रिजसन सिंग (वय 30, रा. हिंजवडी) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची के ए 03 / एच ए 6113 सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क करून ठेवली असता चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 26 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.