Dighi News : ‘रात्री फोनवर कुणाबरोबर बोलतेस’ असे विचारणाऱ्या पोलीस नवऱ्याला बायकोने उलथण्याने मारले 

मुलांनी दिली हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी 

एमपीसी न्यूज – रात्री फोनवर कुणाबरोबर बोलतेस, असे विचारणाऱ्या पोलीस नवऱ्याला बायकोने उलथण्याने मारहाण केली. तसेच मुलांनी त्यांच्या गळा दाबून मारहाण केली व हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरूवारी (दि.7) रोजी गणेशनगर, बोपखेल येथे घडली. 

याप्रकरणी 55 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने दिघी पोलीस ठण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी 44 वर्षीय पत्नी, 24 वर्षीय मुलगा व 22 वर्षीय मुलगी अशा तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातील निवृत्त कर्मचारी असून सध्या ते मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. ते वैद्यकीय रजेवर घरी आले असताना त्यांनी आपल्या पत्नीला रात्री फोनवर कुणाबरोबर बोलत असतेस, अशी विचारणा केली.

त्यामुळे चिडलेल्या पत्नीने उलथण्याच्या सहय्याने पतीला मारहाण केली. तसेच त्याच्या मुलांनी त्यांचा गळा दाबला व हाताने मारहाण केली व हात पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादीच्या डोळ्याखाली गंभीर जखम झाली आहे, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.