Dighi : जुगार अड्ड्यावर छापा; 11 जणांना अटक

एमपीसी न्यूज – दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून 11 जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्याठिकाणाहून सुमारे 43 हजार 770 रुपये जप्त केले आहे. शनिवारी (दि. 14) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

गोपाळ साहेबराव तापकीर (वय 45, रा. चऱ्होली) दत्तात्रय अबाजी राजगुरु (वय 48 रा. राजगुरुनगर), भगवान रोहिदास कांबळे (वय 42, रा. अंबरनाथ, ठाणे) सलीम उस्मान शेख (वय 45 रा. नाणेकरवाडी, चाकण), प्रमोद धर्माराज शेंडे (वय 44, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी), बळीराम माणिक गालफाडे (वय 60, रा. लांडेवाडी, भोसरी) हिरामण गंगाराम राठोड (वय 42), सोमनाथ टिकाराम राठोड (वय 42, दोघेही रा लोहगाव, पुणे) अशोक ज्ञानोबा साकरुडकर (वय 36, रा. केळगाव, आळंदी) विजय अण्णासाहेब रासवे (वय 31, रा. देहुफाटा आळंदी), सोमनाथ बब्रुवान वजरकर (वय 35, रा. आदर्शनगर, दिघी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेवाडी झोपडपट्टीच्या मागे, देहूफाटा आळंदी येथे काहीजण तीन पत्ते जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून अकरा जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 43 हजार 770 रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींवर मुंबई जुगार ऍक्‍ट कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.