Dighi : मोकळ्या जागेत सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा; आरोपींसोबत झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी

एमपीसी न्यूज – मोकळ्या जागेत सुरू असलेल्या कत्तलखान्यावर दिघी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये शेकडो किलो गोमांस एका स्कॉर्पिओ कारमध्ये ठेवल्याचे आढळले. यावर कारवाई करताना आरोपींसोबत झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना मॅगझीन चौक, प्रगती हॉटेलच्या मागे मोकळ्या जागेत आज (सोमवार) पहाटे तीनच्या सुमारास घडली.

मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून प्रगती हॉटेलच्या मागे मोकळ्या जागेत कत्तलखाना सुरू होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी दिघी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार दिघी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक स्कॉर्पिओ कार आणि काही लोक दिसले, पोलीस दिसताच लोकांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता एकाने पोलिसांच्या अंगावर स्कॉर्पिओ घातली. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.