Dighi : बलात्कार आणि ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पोलीस शिपायाला अटक

एमपीसी न्यूज – आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी जवळीक करत शरीरसंबंध प्रस्थापित केला. त्यानंतर महिलेने लग्नाची मागणी केली असता तिला नकार दिला. याबाबत मोटार वाहन परिवहन विभाग पुणे शहर येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला बलात्कार व ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. ही घटना 2016 ते 2018 या कालावधीत वडमुखवाडी च-होली आळंदी या ठिकाणी घडली.

शुभम गजानन मोहिते (रा. पाटील नगर, धनकवडी) असे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2016 ते 2018 या कालावधीत आरोपी शुभम याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लग्नाची मागणी घातली. त्यासाठी महिलेने नकार दिला. शुभम याने आपल्यासोबत लग्न न केल्यास महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून महिलेशी जवळीक करत शरीरसंबंध प्रस्थापित केला. त्यानंतर महिलेने शुभमकडे लग्नाची मागणी केली. मात्र शुभम याने यास साफ नकार दिला.

महिलेने याबाबत तक्रार केल्यास तिचे वडील आणि बहिणीची सरकारी नोकरी घालविण्याची धमकी दिली. झालेला सर्व प्रकार फिर्यादी महिलेने शुभम याच्या आई व बहिणीला सांगितला. त्याच्या आई आणि बहिणीने देखील महिलेला वाईट वागणूक दिली. याबाबत महिलेने दिघी पोलिसात धाव घेत बलात्कार व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.