Dighi : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत दिघी येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अरुण शिंदे (वय 50, रा. दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी या दोघांची पुणे रेल्वे स्टेशन येथील मालधक्क्यावर डिसेंबर 2018 मध्ये ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला मिळाली नाहीस तर मी आत्महत्या करेन किंवा तुला मारून टाकीन’ अशी धमकी देत आरोपीने फिर्यादी महिलेवर फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत दिघी येथील एका लॉजवर नेऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. फ्लॅट घेण्यासाठी महिलेकडून आरोपीने पाच तोळ्यांचे दागिने घेऊन त्यांचा अपहार केला. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.