Dighi : गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तसेच गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच तिचे अश्‍लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

याबाबत 25 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. 16) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निशांत वामन भांगे (वय 28), नंदा वामन भांगे (वय 50) आणि वामन शिवराज भांगे (वय 55) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2016 ते जून 2019 या कालावधीत ही घटना घडली. आरोपी निशांत याने फिर्यादी यांना आपल्या दोन्ही घरच्या परवानगीने लग्न करणार असल्याचे सांगत भेटीगाठी घेण्यास सुरवात केली. त्यानंतर स्वारगेट येथील लॉजवर नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे अश्‍लिल फोटो काढले.

तसेच तरुणीचे अश्‍लिल फोटो सोशल मिडियावर टाकण्याची धमकी दिली. आरोपी नंदा भांगे आणि वामन भांगे यांनी अगोदर विवाहास तयार असल्याचे सांगत नंतर नकार दिला. नंदा यांनी पिडित तरुणीला फोन करून शिवीगाळ केली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.