Dighi : कडी कोयंडा उचकटून सोन्या चांदिचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 22 हजार 500 रुपयांचा सोन्या चांदिचा ऐवज चोरून नेला. ही घटना चऱ्होली येथे शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी उघडकीस आली.

रवींद्र गुंडाप्पा इडगर (वय 32, रा. पिनाकी कॉलनी, चोविसावाडी, चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास रवींद्र हे घराला कुलूप लावून कामाला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरात कपाटात ठेवलेले सहा ग्रॅम सोन्याचे आणि 350 ग्रॅम चांदिचे दागिने असा एकूण 22 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.