Dighi: रोडरोमियो, टवाळखोरांचा दिघी पोलीस करणार बंदोबस्त

नगरसेवक विकास डोळस यांच्या पुढाकाराने पोलीस आणि महिलांचा परिसंवाद

एमपीसी न्यूज – विद्यार्थींनी, महिलांना त्रास देणा-या रोडरोमियो, टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी ‘अँटी रोओमिओ’ पथक तयार केले जाणार आहे. खासगी क्लास, महापालिका शाळा, वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलीस तैनात ठेवल्या जातील. विद्यार्थीनी, महिलांनी टवाळखोर त्रास देत असल्यास, पाठलाग करत असेल. तर, तत्काळ कळवावे, पोलीस त्यांचा बंदोबस्त करतील, अशी ग्वाही दिघी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावांडे यांनी दिली.

हैद्राबाद, उन्नाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार दिघी येथे प्रभागातील विद्यार्थींनी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधिकारी, लोकप्रतिनीधी, मुली, महिला, पालक यांच्यात परिसंवादाचे रविवारी (दि.8) आयोजन करण्यात आले होते.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक विकास डोळस, सामाजिक कार्यकर्ते कुलदिप परांडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड, हिराबाई घुले, प्रभागातील विद्यार्थींनी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

रोडरोमियो, टप-यांपाशी थांबणारे टवाळखोर त्रास देतात. पाठलाग करतात, अशा तक्रारी विद्यार्थींनींनी केल्या. मोकळ्यापणाने त्यांच्या अडचणी मांडल्या. समस्या ऐकूण घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावांडे यांनी मार्गदर्शन केले. ”मुली, महिलांनी अन्यायाविरोधात प्रतिकार करावा. टवाळखोरांच्या दुचाकीचा नंबर नोंद करुन घ्यावा. कोण त्रास देत असेल. पाठलाग करत असल्यास तत्काळ कळवावे. संबंधितांचा बंदोबस्त केला जाईल. मुलींनी सक्षक्त व्हावे. स्वरक्षणासाठी कराटे शिकले पाहिजे”.

”घटना घडली की लपवून ठेऊ नका. पोलीस अथवा घरी सांगावी. मुलीने घरी तक्रार केल्यास पालकांनी मुलींवर दबाव आणू नये. संबंधित मुलाचे नाव पोलिसांना कळवावे. मुलावर कारवाई केली जाईल. खासगी क्लास, शाळांमध्ये तक्रारींसाठी नोंदवही ठेवली जाईल. मुलींनी तक्रार नोंदवावी. क्लास, शाळा, बस स्थानक, वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलीस तैनात ठेवल्या जातील. महिलांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोलिसांचा नंबर अॅड करा. त्यामध्ये ‘कोडओड’ ठेवण्यात यावा. अडचण असल्यास कोडओड ठाकावा. पोलीस, लोकप्रतिनीधींना फोन करुन सांगावा. संबंधितांवर ‘अॅक्शन’ घेता येईल”, असेही लावांडे यांनी सांगितले.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”प्रभागातील विद्यार्थींनी, महिलांसाठी सुरक्षित वातावरण ठेवण्याची नैतिक जबाबदारी लोकप्रतिनीधी म्हणून आमची आहे. त्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तक्रार करण्यासाठी खासगी क्लास, शाळांमध्ये एक फलक लावला आहे. नोंदवही देखील ठेवली आहे. कोणतीही अडचण असेल? कोण त्रास देत असल्यास त्याची नोंद वहीत करावी. तत्काळ पोलीस कारवाई करतील. लोकप्रतिनीधी म्हणून आमचा सदैव पोलिसांना पाठिंबा असेल. विद्यार्थीनी, महिलांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे”.

क्रियेटीव्ह क्लासेस यांनी संयोजनात महत्वाची भुमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलदीप परांडे यांनी केले. नगरसेवक लक्ष्मण उंडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.