Dighi: मैत्रीदिनानिमित्त सामर्थ्य प्रबोधिनीतर्फे स्नेहवनवला शैक्षणिक साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून सामर्थ्य प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या दिघी शाखेतर्फे स्नेहवन या संस्थेस शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी सामर्थ्य प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष सुशांत भिसे, स्नेहवन संस्थेचे संचालक गणेश देशमाने, दिघी शाखेचे उपाध्यक्ष पियुष भालेराव, अशफाक सय्यद, किरण चव्हाण, समाधान कवडे, मनोज साळी, दत्तात्रय पारधी, नवनाथ आरडे, उद्देश टाकसाळकर, ओंकार जाधव, आकाश काटे आदी सभासद उपस्थित होते.

स्नेहवन संस्थेचे संचालक गणेश देशमाने म्हणाले, ” महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणा-या शेतक-यांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसनाचे काम स्नेहवन करते. सध्या 25 निवासी मुले व शेजारील झोपडपट्टीमधील 105 मुलांचे शिक्षण संस्थेमार्फत केले जाते”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.