Dighi Crime News : दिघी, सांगवी, चिखली, हिंजवडी, भोसरी मध्ये पाच चो-या; दोन लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – दिघी, सांगवी, चिखली, हिंजवडी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. या पाच प्रकरणांमध्ये अज्ञात चोरट्यांनी सोन्या  – चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल फोन आणि डिझेल चोरून नेले आहे.

दत्तात्रय दगडू मोरे (वय 21, रा. दत्तनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे यांच्या घराचे लॉक उघडून अज्ञात चोरट्यांनी घरातून एक लाख 62 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी साडेबारा ते सव्वातीन वाजता घडली.

जावेद गणी शेख (वय 45, रा. पवारनगर, थेरगाव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांची 12 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत अंत्यसंस्कार घाट, जुनी सांगवी येथे घडली.

जमालुद्दीन मोहम्मद रफी खान (वय 38, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरून चोरून नेली. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आली.

बिभीषण बाबाराव वाघमोडे (वय 24, रा. बोडकेवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघमोडे यांच्या घरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी त्यांचा 10 हजारांचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.

राहुल वाघंबर शिंदे (वय 31, रा. थेरगाव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे काम करत असलेल्या चिंटू ट्रान्सपोर्ट प्रा ली या कंपनीच्या ट्रकमधून सात हजार रुपयांचे 70 लिटर डिझेल चार अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 21) पहाटे साडेपाच वाजता घडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.