BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : बैल विकणे पडले महाग ; 73 हजारांची फसवणूक

324
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- बैलाच्या खरेदीबाबत व्यवहार ठरवून फक्त ईसार देऊन एकजण बैलांसह गायब झाला. 73 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी (दि.24) दोघांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बैलमालक छबू लक्ष्मण कदम (वय 85, रा. निरगुडी, चऱ्होली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रावसाहेब बाबासाहेब बांडे आणि महेंद्र रावसाहेब बांडे (रा. वडगाव बांडे, दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कदम हे शेतकरी असून त्यांचे दोन बैल विकण्याबाबत आरोपींसोबत 75 हजार रुपयांमध्ये व्यवहार झाला. आरोपींनी फिर्यादी यांना 2 हजार रुपये ईसार देऊन बैल नेले. त्यानंतर त्यांनी उर्वरित 73 हजार रुपये न देता कदम यांची फसवणूक केली आहे. पुढील तपास दिघी पोलिस करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3