Dighi : पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज- पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 19) दिघी येथे सकाळी 10  वाजता उघडकीस आली.

धीरज शिंदे (वय 20 रा. चिंतामणी हौसिंग सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

धीरज याचे वडील दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ते माजी सैनिक देखील आहेत. धीरज याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.