Dighi : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 एप्रिल 2020 रोजी च-होली गाव येथे घडली.

पती महेश बापूसाहेब भोसले (वय 30), सासू संगीता बापूसाहेब भोसले (वय 65 दोघे रा. पठारेमळा, च-होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयत महिलेच्या 50 वर्षीय आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्च 2018 ते 20 एप्रिल 2020 या कालावधीत आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्या मुलीला माहेरहून पैसे आणि गाडी आणण्याची मागणी केली.

तसेच विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.