Dighi : अज्ञात महिलेचा निर्घृणपणे खून; च-होली बुद्रुक येथील एका शेतात आढळला मृतदेह

अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – च-होली बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. महिलेच्या शरीरावरील जखमांवरून तिचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.

खून झालेल्या महिलेची ओळख पटली नसून तिचे अंदाजे वय 45 वर्ष आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक फारूक याकूब सय्यद सोलापुरे यांनी दिघी पोलीस ठाण्यात पोलिसांतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, च-होली बुद्रुक येथील बुर्डेवस्ती हिरामाता मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला महादेव बुर्डे यांचे शेत आहे. ते शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेतात गेले असताना त्यांना अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. दिघी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

40 ते 45 वर्ष वयाच्या महिलेच्या डोक्यावर, कपाळावर आणि छातीवर मारून तिला गंभीर जखमी करून तिचा निर्घृणपणे खून केला असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.