BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या तडीपार गुंडाला बेड्या

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या तडीपार गुंडाला दिघी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) सावंतनगर दिघी येथे करण्यात आली.

निखिल रामचंद्र ढाबळे (वय 21, रा. सावंतनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीत दिघी पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी निशिकांत नांगरे यांना माहिती मिळाली की, तडीपार गुंड सावंतनगर कमानीजवळ थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपी निखिल पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आला असल्याचे त्याने सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3