Dighi : पती बोलत नसल्याने डॉक्टर महिलेने मारली सातव्या मजल्यावरून उडी

एमपीसी न्यूज – पती बोलत (Dighi) नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून डॉक्टर महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री अकरा वाजताच्या सुमारास डुडुळगाव येथे घडली.
अपर्णा अभिजीत शिंदे (वय 32, रा. डुडळगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अपर्णा आणि त्यांचे पती अभिजीत हे दोघेही डॉक्टर आहेत.
Dighi : इमारतीवरून पडून वृद्धाचा मृत्यू
त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यामुळे (Dighi) ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. त्यातच पती अभिजीत शिंदे हे त्यांच्या मुलीला घेऊन गावी गेले. त्यामुळे अपर्णा यांना नैराश्य आले. त्या नैराश्यातून अपर्णा यांनी रविवारी रात्री इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.