Dighi : कुलूप तोडून कार्यालयातून लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरला

एमपीसी न्यूज – कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयातून लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, इंटरनेटचे राउटर आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. 5) सकाळी दहा वाजता काळे कॉलनी दिघी येथे उघडकीस आला आहे.

दत्तात्रय बाळासाहेब फुले (वय 37 रा. च-होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फुले यांचे दिघी येथे आळंदी-पुणे रोडवर काळे कॉलनी येथे कार्यालय आहे. बुधवारी रात्री सात वाजता त्यांनी त्यांचे कार्यालय कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

कार्यालयातून लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, इंटरनेटचे एक राउटर आणि रोख रक्कम असा एकूण 31 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी कार्यालय उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.