Dighi : महिला दिनाच्या निमित्ताने येसूबाई अन् इंदुबन महिला बचत गट सुरु

एमपीसी न्यूज – इंदुबन रेसिडेन्सी भोसरी दिघी रोड येथे महिला दिनाच्या निमित्ताने येसूबाई महिला बचत गट तसेच इंदुबन महिला बचत गट ह्यांची सुरुवात करण्यात आली.ह्या वेळी नगरसेवक अजित गव्हाणे ह्याच्या पत्नी वैशाली गव्हाणे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला सक्षमीकरणासाठी बचत गट एक प्रभावी माध्यम आहे आणि आजच्या दिवशी ह्याची सुरुवात झाली. ह्याचा अभिमान वैशाली गव्हाणे ह्यांनी मांडला.

तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पावले उचलून सर्व महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणार आहे, असे मत अध्यक्षा रेखा महाजन तसेच स्वाती वाव्हळ ह्यांनी मांडले. तसेच सोसायटीमधील दैनंदिन साफसफाई सेवा पुरवणाऱ्या महिलांचा ह्या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.