Dighi : सिमेंट ब्लॉक फॅक्टरीमधून हॅलोजन बल्ब, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरी

एकूण अकरा हजार रुपयांचा माल आरोपी यांनी चोरून नेला. : Theft of halogen bulbs, CCTV cameras from cement block factory

एमपीसी न्यूज – चोरट्यांनी सिमेंट ब्लॉक फॅक्टरीमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तीन हॅलोजन बल्ब चोरून नेले. ही घटना ताजणेमळा, चऱ्होली येथे गुरुवारी (दि. 30) रात्री घडली.

याप्रकरणी पुष्कराज मनसुखलाल अग्रवाल (वय 42, रा. पिंपळे गुरव) यांनी  दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार रमेश गुंड (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व एक अनोळखी आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ताजणेमळा येथे सिमेंट ब्लॉक तयार करण्याची फॅक्टरी आहे.

या फॅक्टरीतील सहा हजार रुपये किंमतीचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे व पाच हजार रुपये किमतीचे तीन हॅलोजन बल्ब, असा एकूण अकरा हजार रुपयांचा माल आरोपी यांनी चोरून नेला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.